संतसंगतीने आत्मज्ञान
मना गूज रे तूज हें प्राप्त जालें । परी अंतरीं पाहिजे येत्न केले । सदा श्रवणें पाविजे निश्चयासी । धरीं सज्जनसंगती धन्य होसी ॥
हे मना, परमात्म्याचे जे रहस्य आहे ते तुला मिळाले आहे. पण त्याचा अनुभव येण्यास तुला अंतर्यामी साधन केले पाहिजे. संतांचा उपदेश सतत श्रवण केल्यामुळे तुला आत्मज्ञान निश्चित मिळेल. म्हणून तू संतांची संगती धर. त्या योगे धन्य होशील.
Self-Knowledge Through the Company of Saints
मना गूज रे तूज हें प्राप्त जालें । परी अंतरीं पाहिजे येत्न केले । सदा श्रवणें पाविजे निश्चयासी । धरीं सज्जनसंगती धन्य होसी ॥
O mind, the secret of the Supreme has already been given to you, but to truly experience it you must make inward effort. By constantly listening to the teachings of the saints, you will surely attain self-knowledge. So hold fast to the company of the good, and through it you will be blessed.