संतवचनांनी कळते परब्रह्माचे रूप
नव्हे तें चि जालें नसे तेंचि आलें। कळों लागलें सज्जनाचेनि बोलें। अनुर्वाच्य तें वाच्य वाचे वदावें। मना संत अनंत शोधीत जावें॥
जे निर्गुण परब्रह्म होते, त्याला मायेमुळे सगुणता प्राप्त झाली. जे अव्यक्त स्वरुपात होते, ते सगुण-साकार झाले. संतांच्या सांगण्यामुळे या गोष्टी कळू लागल्या. खरे तर परब्रह्म हे सांगता येण्याच्या पलीकडचे आहे. म्हणून हे मना, संतांच्या उपदेशाप्रमाणे तू परमात्म्याचे स्वरूप शोधण्याचा प्रयत्न कर.
Through the Saints' Words, the Formless Is Known
नव्हे तें चि जालें नसे तेंचि आलें। कळों लागलें सज्जनाचेनि बोलें। अनुर्वाच्य तें वाच्य वाचे वदावें। मना संत अनंत शोधीत जावें॥
The formless, attributeless Brahman took on qualities and form through maya; what was unmanifest became manifest and embodied. These truths came to be understood only through what the saints have taught. In reality, Brahman is beyond all telling. So, mind, strive to seek out the nature of the Supreme Self as the saints instruct.