सत्पुरुषाचे दर्शन-सान्निध्य
हरीभक्त वीरक्त विज्ञानरासी। जेणें मानसीं स्थापिलें निश्चयासी। तया दर्शनें स्पर्शनें पुण्य जोडे। तया भाषणें नष्ट संदेह मोडे॥
जो भगवंताची उत्कट भक्ती करतो, जो वैराग्य-संपन्न आहे ज्ञानी आहे आणि ज्याला पारमार्थिक अनुभव लाभला आहे, अशा सत्पुरुषाच्या दर्शनामुळे व त्याचा स्पर्श झाल्यामुळे मोठे पुण्य प्राप्त होते. त्या संत पुरुषाच्या वचनांमुळे मनातील संशय नष्ट होतात.
The Merit of a Saint's Presence
हरीभक्त वीरक्त विज्ञानरासी। जेणें मानसीं स्थापिलें निश्चयासी। तया दर्शनें स्पर्शनें पुण्य जोडे। तया भाषणें नष्ट संदेह मोडे॥
Merit is gained by the sight and touch of a saintly person who is an ardent devotee of the Lord, richly endowed with dispassion and wisdom, and who has attained true spiritual experience with a settled, resolute mind. Through such a saint's words, all doubts in the mind are destroyed.