सृष्टिलीला व चिरंजीव भक्त
वसे मेरुमांदार हे सृष्टिलीळा । शशी सूर्य तारांगणें मेघमाळा । चिरंजीव केले जनीं दास दोन्ही । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥
ईश्वराने आपल्या लीलेने या सृष्टीची रचना केली. तिच्यामध्ये मेरु-मांदार इ. पर्वत, सूर्य-चंद्र, तारांगणे व मेघमाला आहेत. प्रभू रामाने बिभीषण आणि हनुमान या दोन्ही भक्तांना चिरंजीव बनविले. असा हा राम आपल्या भक्तांचा अभिमानी असल्यामुळे त्यांची उपेक्षा कधीही करीत नाही.
Immortal Devotees of Rama
वसे मेरुमांदार हे सृष्टिलीळा । शशी सूर्य तारांगणें मेघमाळा । चिरंजीव केले जनीं दास दोन्ही । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥
God, through his divine play, fashioned this creation, containing mountains such as Meru and Mandara, the sun and moon, the constellations and the clouds. Lord Rama made both his devotees Bibhishana and Hanuman immortal. Being so proud of his devotees, this Rama never neglects them.