त्रिगुणांत अडकलेले मन
जयाचें तया चूकलें प्राप्त नाहीं। गुणें गोविलें जाहलें दुख देहीं। गुणावेगळी वृति ते ही वळेना। जुनें ठेवणें मीपणें आकळेना॥
आत्मस्वरूप हे प्रत्येकाच्या मालकीचे आहे. ते हरवल्यामुळे सापडत नाही. जीव सत्त्व, रज, तम या त्रिगुणांत सापडल्यामुळे मनुष्याला देहाचे दु:ख भोगावे लागते. त्याची मनोवृत्ती गुणांपासून वेगळी होऊ शकत नाही. म्हणून त्याच्याजवळ असलेल्या शाश्वत आत्मस्वरूपाचा त्याला माहीत नसतो.
Trapped by the Three Qualities
जयाचें तया चूकलें प्राप्त नाहीं। गुणें गोविलें जाहलें दुख देहीं। गुणावेगळी वृति ते ही वळेना। जुनें ठेवणें मीपणें आकळेना॥
The nature of the Self belongs to everyone, but losing sight of it, one cannot find it. Caught among the three qualities of sattva, rajas, and tamas, a person must suffer the body's pain, and the mind cannot separate itself from these qualities, so one never knows the eternal Self already within reach.