उन्मनी अवस्थेतील राम-दर्शन
कळे आकळे रूप तें ज्ञान होतां । तेथें आटली सर्वसाक्षी अवस्था । मना उन्मनी शब्द कुंठीत राहे । तो गे तो चि राम सर्वत्र पाहे ॥
गुरुकृपेने ज्ञान झाले म्हणजे ते परमात्म-स्वरूप कळते व त्याचे आकलन होते. तेथे सर्वसाक्षी अवस्थाही विलीन होऊन जाते. मन उन्मन होऊन जाते आणि शब्द कुंठित होऊन जातात. मग एका परमात्म्याखेरीज सर्वत्र काहीच दिसत नाही.
pocketpage.in
Beyond the Witness State, Only Rama Remains
कळे आकळे रूप तें ज्ञान होतां । तेथें आटली सर्वसाक्षी अवस्था । मना उन्मनी शब्द कुंठीत राहे । तो गे तो चि राम सर्वत्र पाहे ॥
When knowledge dawns through the guru's grace, that Supreme form becomes known and understood, and even the state of being the all-witness dissolves. The mind rises beyond itself and words fail. Then nothing at all is seen anywhere except that one Rama.
pocketpage.in