विषयचिंतनाने जन्ममृत्यूचे बंधन
सदा वीषयो चिंततां जीव जाला। अहंभाव अज्ञान जन्मासि आला। विवेकें सदा स्वस्वरूपीं भरावें। जिवा ऊगमीं जन्म नाहीं स्वभावें॥
सतत विषयांचाच विचार केल्याने जीवदशा प्राप्त होते. त्यामुळे अहंभाव आणि अज्ञान उत्पन्न होते. जन्म-मरणाच्या पलीकडे जाण्यासाठी मोठ्या विवेकाने स्वस्वरूपामध्ये मग्न व्हावे. जीवाचे जे उगम स्थान आहे, त्या आत्मस्वरूपामध्ये मग्न झाल्यावर जन्म-मरणाचा संबंध उरत नाही.
Sense-Obsession Binds Us to Birth and Death
सदा वीषयो चिंततां जीव जाला। अहंभाव अज्ञान जन्मासि आला। विवेकें सदा स्वस्वरूपीं भरावें। जिवा ऊगमीं जन्म नाहीं स्वभावें॥
Constantly dwelling on sense-objects keeps one bound to the state of a limited soul, giving rise to ego and ignorance. Through great discernment one should instead dwell absorbed in one's own true nature; once merged in that source from which the soul arises, the bond of birth and death no longer holds.