विवेकाने आचरण-शुद्धी
विवेकें क्रिया आपुली पालटावी। अती आदरें शुध क्रिया धरावी। जनीं बोलण्यासारिखें चाल बापा। मना कल्पना सोडि संसारतापा॥
मोठ्या विवेकाने सारासार विचार करून आपले आचरण सुधारावे. आणि आपली क्रिया अतिशय शुध ठेवावी. हे मना, जगामध्ये बोलल्याप्रमाणे वागावे. संसार दु:खमय आहे, तेव्हा कल्पना करीत बसण्याचे सोडून द्यावे.
pocketpage.in
Reforming Conduct Through Discernment
विवेकें क्रिया आपुली पालटावी। अती आदरें शुध क्रिया धरावी। जनीं बोलण्यासारिखें चाल बापा। मना कल्पना सोडि संसारतापा॥
Use sound judgment to weigh things carefully and reform your conduct, keeping your actions thoroughly pure. O mind, live in the world exactly as you preach. Since worldly life is full of sorrow, give up dwelling in idle fantasy.
pocketpage.in