Abhang 12
न देखें न बोलें नाइकें आणीक । बैसला हा एक हरि चित्तीं ॥ १ ॥ सासुरें माहेर मज नाहीं कोणी । एक केलें दोन्ही मिळोनियां ॥ २ ॥ आळ आला होता आह्मी भांडखोरी । तुका ह्मणे खरी केली मात ॥ ३ ॥
मी आता दुसरं काही पाहत नाही, बोलत नाही, ऐकत नाही; एक हरीच माझ्या मनात स्थिरावला आहे. आता माझं सासर किंवा माहेर असं वेगळं उरलेलंच नाही - दोन्ही मी एकच करून टाकली आहेत. आम्ही भांडखोर आहोत असा आरोप झाला होता - तुकाराम म्हणतात, तो आरोप आता आम्ही खराच करून दाखवला.
pocketpage.in