Abhang 16
सर्व सुख आह्मी भोगूं सर्व काळ । तोडियेलें जाळ मोहपाश ॥ १ ॥ याचसाठीं सांडियेले भरतार । रातलों या परपुरूषाशीं ॥ २ ॥ तुका ह्मणे आतां गर्भ नये धरूं । औषध जें करूं फळ नव्हे ॥ ३ ॥
आता आम्ही कायम सगळं सुख उपभोगू - मोहाचा फास आम्ही कापून टाकला आहे. म्हणूनच मी नवरा सोडून दिला, आणि या दुसऱ्या पुरुषाशी रंगून गेले. तुकाराम म्हणतात, आता पुन्हा संसाराची आस धरू नकोस - काहीही उपाय केलात तरी आता त्याचा काही उपयोग होणार नाही.
pocketpage.in