Abhang 160
उपजोनियां पुढती येऊं । काला खाऊं दहींभात ॥१ ॥ ॥ ध्रु. ॥ वैकुंठी तों ऐसें नाहीं । कवळ कांहीं काल्याचे ॥ १ ॥ एकमेकां देऊं मुखीं । सुखीं घालूं हुंबरी ॥ २ ॥ तुका ह्मणे वाळवंट । बरवें नीट उत्तम ॥ ३॥
पुन्हा एकदा जन्म घेऊन याच ठिकाणी परत यावं आणि दहीभाताचा काला खावा असं वाटतं. वैकुंठातसुद्धा असा काल्याचा एक घासही मिळत नाही. एकमेकांच्या तोंडात घास भरवावा आणि आनंदाने हुंबरीचा खेळ खेळावा. तुकोबा म्हणतात, (पंढरीचं) हे वाळवंट खरोखरच खूप छान आणि उत्तम जागा आहे.
pocketpage.in