Abhang 161
याल तर या रे लागें । अवघे माझ्या मागें मागें ॥१ ॥ ॥ ध्रु. ॥ आजि देतों पोटभरी । पुरे ह्मणाल तोंवरी ॥ १ ॥ हळू हळू चला । कोणी कोणाशीं न बोला ॥२ ॥ तुका ह्मणे सांडा घाटे । तेणें नका भरूं पोटें ॥ ३॥
येणार असाल तर या रे लगेच, सगळेजण माझ्या मागे मागे चला. आज मी तुम्हाला पोटभर देतो, जोपर्यंत तुम्ही 'पुरे' म्हणत नाही तोवर देत राहीन. हळूहळू चला, आपापसांत उगीच बोलू नका. तुकोबा म्हणतात, उतावळेपणा सोडून द्या, त्यामुळे उगीच पोट भरून घेऊ नका (घाईने खाऊ नका).
pocketpage.in