Abhang 183
घेती पाण्यासी हुंबरी । त्यांचें समाधान करी ॥१ ॥ ॥ ध्रु. ॥ ऐशी गोपाळांची सवे । जाती तिकडे मागे धांवे ॥ १ ॥ स्थिरावली गंगा । पांगविली ह्मणे उगा ॥ २ ॥ मोहरी पांवा काठी । तुका ह्मणे याजसाठीं ॥३ ॥
गुरं पाण्यासाठी हंबरतात, तेव्हा तो त्यांचं समाधान करतो. गोपाळांची अशी सवयच आहे, ते जिकडे जातात तिकडे तो मागोमाग धावत जातो. वाहणारी गंगा (नदी) शांत स्थिर झाली, तो म्हणतो शांत राहा, उगीच गोंधळ नको. बासरी, शिंग आणि काठी हीच त्याची साथ, तुकोबा म्हणतात, ती याच्यासाठीच आहेत.
pocketpage.in