Abhang 186
तुझिये संगति । जाली आमुची निश्चिति ॥१ ॥ ॥ ध्रु. ॥ नाहीं देखिलें तें मिळे । भोग सुखाचे सोहळे ॥ १ ॥ घरीं ताकाचें सरोवर । येथें नवनीताचे पूर ॥ २ ॥ तुका ह्मणे आतां । आह्मी न वजों दवडितां ॥ ३॥
तुझ्या सहवासात असल्याने, आमची खात्रीच पटली आहे (मनाची निश्चिती झाली आहे). जे आधी कधी पाहिलंही नव्हतं असं सुख आणि आनंदाचे सोहळे आता आम्हाला मिळत आहेत. आमच्या घरी नुसतंच ताकाचं तळं होतं, इथे मात्र लोण्याचा पूर आहे. तुकोबा म्हणतात, आता आम्हांला हाकलून दिलं तरी आम्ही इथून जाणार नाही.
pocketpage.in