Abhang 198
चला वळूं गाई । बैसों जेऊं एके ठायीं ॥१॥ ॥ ध्रु. ॥ बहु केली वणवण । पायपिटी जाला सिण ॥ १ ॥ खांदीं भार पोटीं भुक । काय खेळायाचें सुख ॥२ ॥ तुका ह्मणे धांवे । मग अवघें बरवें ॥३॥
चला, गाई परत वळवून घरी घेऊन जाऊया, आणि एका जागी बसून जेवूया. खूप भटकंती झाली, चालून चालून पाय दुखले, शीण आला. खांद्यावर ओझं आणि पोटात भूक असताना खेळण्यात कसलं आलंय सुख? तुकोबा म्हणतात, आता घराकडे धावा, मग सगळं काही चांगलं वाटेल.
pocketpage.in