Abhang 20
शिकविलें तुह्मी तें राहे तोंवरी । मज आणि हरी वियोग तों ॥ १ ॥ प्रसंगी या नाहीं देहाची भावना । तेथें या वचना कोण मानी ॥ २ ॥ तुका ह्मणे चित्तीं बैसला अनंत । दिसों नेंदी नित्य अनित्य तें ॥ ३ ॥
तुम्ही जे मला शिकवलंत, ते तेवढ्यापुरतंच टिकेल जोवर माझी हरीशी भेट झालेली नाही. एकदा ती भेट झाली, की देहाचं भानच उरत नाही; मग या शिकवणीच्या शब्दांना कोण मानणार? तुकाराम म्हणतात, माझ्या मनात तो अनंत येऊन स्थिरावला आहे - आता नित्य काय आणि अनित्य काय, हा भेदच मला जाणवू देत नाही.
pocketpage.in