Abhang 21
सांगतों तें तुह्मी अइकावें कानीं । आमुचे नाचणीं नाचूं नका ॥ १ ॥ जोंवरी या तुह्मां मागिलांची आस । तोंवरी उदास होऊं नका ॥ २ ॥ तुका ह्मणे काय वांयांविण धिंद । पति ना गोविंद दोन्ही नाहीं ॥ ३ ॥
मी जे सांगते ते नीट कान देऊन ऐका - आमचं अनुकरण करून आमच्यासारखा नाच करू नका. जोवर तुमच्या मनात जुन्या गोष्टींची आस शिल्लक आहे, तोवर उगीच वैराग्याचं सोंग आणू नका. तुकाराम म्हणतात, खरी ओढ नसताना उगाच अवडंबर माजवून काय उपयोग? तसं केलंत तर ना संसार राहील, ना परमेश्वर मिळेल.
pocketpage.in