Abhang 224
आह्मी गोवळीं रानटें । नव्हों जनांतीळल धीटें ॥१॥ ॥ध्रु.॥ सिदोरीचा करूं काला । एक वांटितों एकाला । खेळों आपआपणांशीं । आमचीं तीं आह्यांपाशीं ॥२॥ मिळालों नेणते । तुका कान्होबा भोंवते ॥३॥
आम्ही रानटी गोवळी (गुराखी) आहोत, शहरातल्या सुसंस्कृत माणसांसारखे धीट-चतुर नाही. शिदोरीचा एकत्र काला करू, एकेकाला एकेक वाटा वाटून देऊ. आपापसांत आम्ही खेळू, आमचं जे आहे ते आमच्याचपाशी असू दे. आम्ही भोळे-नेणते एकत्र जमलो आहोत, तुकाराम म्हणतात, कान्होबा आमच्याभोवती, आमच्यासोबत आहे.
pocketpage.in