Abhang 227
डाई घालुनियां पोरें । त्यांचीं गुरें चुकवीलीं ॥१॥ ॥ध्रु.॥ खेळ खेळतां फोडिल्या डोया । आपण होय निराळा । मारिती माया घेती जीव । नाहीं कीव अन्यायें ॥२॥ तुका कान्होबा मागें । तया अंगे कळों आळे ॥३॥
पोरांना पैज लावून, खेळात गुंतवून त्यांची गुरे भलतीकडे नेली, हरवली. खेळ खेळताना डोळे जखमी झाले, आणि आपण मात्र अलिप्त राहतो. आया मारतात, जीव घेतील इतका राग येतो, अन्याय करूनही त्यांना काही कीव येत नाही. तुका म्हणतो, कान्होबा मागे उभा राहिला, तेव्हाच त्याचं खरं रूप कळून आलं.
pocketpage.in