Abhang 232
मागायास गेलों सिदोरी । तुझ्या मायाघरीं गांजियेलों ॥१॥ ॥ध्रु.॥ तुजविणें ते नेदी कोणा । सांगतां खुणा जिवें गेलों । बांयांविण केली येरझार । आतां पुरे घर तुझी माया ॥२॥ तुका ह्मणे तूं आह्मां वेगळा । राहें गोपाळा ह्मणउनी ॥३॥
शिदोरी मागायला गेलो, तर तुझ्या आईच्या घरी मला गांजलं, छळलं गेलं. तुझ्याशिवाय ती कुणालाही देत नाही, खुणेने सांगतानाही जीव मेटाकुटीला आला. विनाकारण येरझाऱ्या घातल्या, आता पुरे झालं तुझं घर आणि तुझी माया. तुकाराम महाराज म्हणतात, गोपाळा, तू आमच्यापासून वेगळा राहा असं म्हणून.
pocketpage.in