Abhang 24
मरणाही आधीं राहिलों मरोनी । मग केलें मनीं होतें तैसें ॥ १ ॥ आतां तुह्मी पाहा आमुचें नवल । नका वेचूं बोल वांयांविण ॥ २ ॥ तुका ह्मणे तुह्मी भयाभीत नारी । कैसे संग सरी तुह्मां आह्मां ॥ ३ ॥
मरणाच्या आधीच मी जणू मरून गेले आहे; मग मनात जे वाटलं तेच मी केलं. आता तुम्ही आमचं हे अजब कृत्य नुसतं बघत रहा; उगीच शब्द वाया घालवू नका. तुकाराम म्हणतात, तुम्ही घाबरट, भित्र्या बायका आहात - तुमची बरोबरी आमच्याशी कशी होणार?
pocketpage.in