Abhang 243
संताचे गुण दोष आणितां या मना । केलिया उगाणा सुकृताचा ॥१॥ ॥ध्रु.॥ पिळोनियां पाहे पुष्पाचा परिमळ । चिरोनि केळी केळ गाढव तो । तुका ह्मणे गंगे अग्नीसि विटाळ । लावी तो चांडाळ दुःख पावे ॥२॥
संतांचे गुण-दोष मनात आणून तपासणं म्हणजे आपण केलेल्या पुण्याईचाच नाश करणं. फुलाचा सुगंध कसा आहे हे बघायला त्याला पिळणारा, किंवा केळीचं झाड चिरून केळं शोधणारा हा गाढवच म्हणायचा. तुकाराम महाराज म्हणतात, गंगेला किंवा अग्नीला विटाळ लावणारा तो चांडाळच ठरतो, आणि त्यालाच दुःख भोगावं लागतं.
pocketpage.in