Abhang 25
परपुरुषाचें सुख भोगे तरी । उतरोनि करीं घ्यावें सीस ॥ १ ॥ संवसारा आगी आपुलेनि हातें । लावूनि मागुतें पाहूं नये ॥ २ ॥ तुका ह्मणे व्हावें तयापरी धीट । पतंग हा नीट दीपासोई ॥ ३ ॥
जर परपुरुषाचं (परमेश्वराचं) सुख उपभोगायचं असेल, तर आपलं मस्तक कापून द्यायचीही तयारी हवी. एकदा स्वतःच्या हातांनी संसाराला आग लावली, की मागे वळून बघायचं नाही. तुकाराम म्हणतात, दिव्याच्या ज्योतीकडे बिनधास्त झेपावणाऱ्या पतंगासारखं धीट व्हायला हवं.
pocketpage.in