Abhang 252
इहलोकींचा हा देहे । देव इच्छिताती पाहें ॥१॥ ॥ध्रु.॥ धन्य आह्मी जन्मा आलों । दास विठोबाचे जालों ॥२॥ आयुष्याच्या या साधनें । सच्चिदानंद पदवी घेणें ॥३॥ तुका ह्मणे पावठणी । करूं स्वर्गाची निशाणी ॥४॥
हा मनुष्यदेह याच पृथ्वीवरचा आहे, पण असा जन्म मिळावा अशी देवांनाही इच्छा असते, हे लक्षात घ्या. आम्ही धन्य आहोत की असा जन्म आम्हाला मिळाला आणि आम्ही विठोबाचे दास झालो. या आयुष्याचा उपयोग साधना करण्यासाठी करून सच्चिदानंद पद मिळवायचे आहे. तुकाराम महाराज म्हणतात, या देहाचा एक पायरीसारखा उपयोग करून आपण स्वर्गाच्या शिखरावर पताका रोवू.
pocketpage.in