Abhang 271
रडोनियां मान । कोण मागतां भूषण ॥१॥ ॥ध्रु.॥ देवें दिलें तरी गोड । राहे रुचि आणि कोड ॥२॥ लावितां लावणी । विके भीके केल्या दानी ॥३॥ तुका ह्मणे धीरा । विण कैसा होतो हिरा ॥४॥
रडून-भेकून मागितलेला मान-सन्मान तो काय कामाचा? पण देवाने स्वतःहून जर काही दिले, तर तेच गोड लागते, त्यातच खरी चव आणि समाधान असते. एखादी गोष्ट पदरात पाडून घेण्यासाठी घासाघीस केली, की ती जणू भीक मागून मिळालेल्या दानासारखी स्वस्त, कमी मोलाची होऊन जाते. तुकाराम महाराज म्हणतात, धीराशिवाय, सोसल्याशिवाय हिरा तरी कसा तयार होतो?
pocketpage.in