Abhang 28
बहुतांच्या आह्मी न मिळों मतासी । कोणी कैसी कैसी भावनेच्या ॥ १ ॥ विंचार करितां वांयां जाय काळ । लटिकें तें मूळ फजितीचें ॥ २ ॥ तुका ह्मणे तुह्मी करा घटापटा । नका जाऊं वाटा आमुचिया ॥ ३ ॥
आम्ही अनेकांच्या मतांशी सहमत होणार नाही - कुणाची भावना कशी असेल हे कोण जाणे. यावर विचार, वाद करत बसलो तर उगीच वेळ वाया जातो - त्या वादाचं मूळच मुळी लटकं आणि फसवं असतं. तुकाराम म्हणतात, तुम्ही खुशाल तुमचं बाह्य अवडंबर, सोंग करत बसा - फक्त आमच्या वाटेला येऊ नका.
pocketpage.in