Abhang 280
आणिकांच्या घातें । ज्यांची निवतील चित्तें ॥१॥ ॥ध्रु.॥ ते चि ओळखावे पापी । निरयवासी शीघ्रकोपी ॥२॥ कान पसरोनी । ऐके वदे दुष्ट वाणी ॥३॥ तुका ह्मणे भांडा । धीर नाहीं ज्याच्या तोंडा ॥४॥
ज्यांचे मन दुसऱ्याच्या नुकसानाने, वाईटावर सुखावते, त्यांनाच खरे पापी, नरकवासी आणि तापट स्वभावाचे समजावे. असे लोक कान टवकारून ऐकतात आणि दुष्ट, वाईट बोलतात. तुकाराम महाराज म्हणतात, अशा भांडखोर माणसाच्या तोंडाला काही ताळतंत्रच नसते.
pocketpage.in