Abhang 284
हनुमंत महाबळी । रावणाची दाढी जाळी ॥१॥ ॥ध्रु.॥ तया माझा नमस्कार । वारंवार निरंतर ॥२॥ करोनी उड्डाण । केलें लंकेचे शोधन ॥३॥ जाळीयेली लंका । धन्य धन्य ह्मणे तुका ॥४॥
महाबलाढ्य हनुमंताने रावणाची दाढी जाळली, त्याला पुरते नामोहरम केले. त्याला माझा वारंवार, सतत नमस्कार असो. आकाशात उड्डाण करून त्याने लंकेचा शोध घेतला, आणि लंका जाळून टाकली. तुकाराम महाराज म्हणतात, धन्य धन्य तो हनुमंत!
pocketpage.in