Abhang 288
चंदनाचे हात पाय ही चंदन । परिसा नाहीं हीन कोणी अंग ॥१॥ ॥ध्रु.॥ दीपा नाहीं पाठीं पोटीं अंधकार । सर्वा गे साकर अवघी गोड ॥२॥ तुका ह्मणे तैसा सज्जनापासून । पाहातां अवगुण मिळे चि ना॥३॥
चंदनाचे हात-पाय, त्याचे कोणतेही अंग घेतले तरी ते चंदनच असते, त्यात कुठेही उणेपणा नसतो. दिव्याच्या मागे किंवा आत कुठेही अंधार नसतो; साखरेचा कणन्कण गोडच असतो. तुकाराम महाराज म्हणतात, त्याचप्रमाणे खऱ्या सज्जन माणसामध्ये कितीही शोधले तरी एकही दोष सापडत नाही.
pocketpage.in