Abhang 3
सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती । रखुमाईच्या पती सोयरिया ॥ १ ॥ ध्रु. ॥ गोड तुझें रूप गोड तुझें नाम । देई मज प्रेम सर्व काळ ॥ ध्रु. ॥ विठो माउलिये हा चि वर देई । संचरोनि राहीं हृदयामाजी ॥ २ ॥ तुका ह्मणे कांहीं न मागे आणीक । तुझे पायीं सुख सर्व आहे ॥ ३ ॥
हे रखुमाईच्या पती, माझ्या जिवलगा, माझे डोळे सदैव तुझ्याच रूपाकडे लागून राहोत. तुझं रूप गोड आहे, तुझं नाव गोड आहे; मला कायम तुझं प्रेम दे. विठोबा माऊली, मला एवढंच वरदान दे - माझ्या हृदयात येऊन वस्ती कर. तुकाराम म्हणतात, मी आणखी काही मागत नाही - तुझ्या चरणीच सगळं सुख आहे.
pocketpage.in