Abhang 31
न बोलतां तुह्मां कळों न ये गुज । ह्मणउनी लाज सांडियेली ॥ १ ॥ आतां तुह्मां पुढें जोडीतसें हात । नका कोणी अंत पाहों माझा ॥ २ ॥ तुका ह्मणे आह्मी बैसलों शेजारीं । करील तें हरी पाहों आतां ॥ ३ ॥
न बोलता तुम्हाला माझ्या मनातलं रहस्य कळणार नाही, म्हणून मी लाज बाजूला ठेवली आहे. आता मी तुमच्यापुढे हात जोडते - कुणीही माझा अंत, माझी परीक्षा पाहू नका. तुकाराम म्हणतात, आम्ही तर त्याच्या शेजारी जाऊन बसलो आहोत - आता पुढे हरी जे करेल ते पाहूया.
pocketpage.in