Abhang 319
कृपा करुनी देवा । मज साच तें दाखवा ॥१॥ ॥ ध्रु. ॥ तुह्मी दयावंत कैसे । कीर्ति जगामाजी वसे ॥१॥ पाहोनियां डोळां । हातीं ओढवाल काळा ॥२॥ तुका ह्मणे देवा । माझा करावा कुठावा ॥३॥
देवा, कृपा करून मला खरं तेच दाखव. तू किती दयावंत आहेस, तुझी कीर्ती अवघ्या जगात पसरली आहे. डोळ्यांनी पाहून तू स्वतःच्या हाताने मला काळाच्या तावडीतून ओढून बाहेर काढशील. तुकाराम म्हणतात, देवा, माझा सोक्षमोक्ष तूच लाव.
pocketpage.in