Abhang 321
तुझें वर्म ठावें । माझ्या पाडियेलें भावें ॥१॥ ॥ ध्रु. ॥ रूप कासवाचे परी । धरुनि राहेन अंतरीं ॥१॥ नेदी होऊं तुटी । मेळवीन दृष्टादृष्टी ॥२॥ तुका ह्मणे देवा । चिंतन तें तुझी सेवा ॥३॥
तुझं वर्म मला कळलं आहे; ते मी माझ्या श्रद्धेने, भावाने पकडलं आहे. कासवी जशी आपल्या पिल्लांना नुसत्या नजरेने जिवंत ठेवते, तसंच मी तुला माझ्या अंतःकरणात धरून ठेवीन. तुझी माझी ताटातूट होऊ देणार नाही; डोळ्यांत डोळे घालून तुझ्याशी एकरूप होईन. तुकाराम म्हणतात, देवा, तुझं सतत चिंतन करणं हीच खरी तुझी सेवा आहे.
pocketpage.in