Abhang 33
सावध जालों सावध जालों । हरिच्या आलों जागरणा ॥ १ ॥ ध्रु. ॥ तेथें वैष्णवांचे भार । जयजयकार गर्जतसे ॥ ध्रु. ॥ पळोनियां गेली झोप । होतें पाप आड तें ॥ २ ॥ तुका ह्मणे तया ठाया । ओल छाया कृपेची ॥ ३ ॥
मी सावध झालो, मी सावध झालो - हरीच्या जागरणाला मी आलो आहे. तिथे वैष्णवांचा मोठा जमाव जमला आहे, आणि जयजयकाराचा गजर होतो आहे. झोप पळून गेली - खरं तर पापच झोपेच्या रूपानं आड येत होतं. तुकाराम म्हणतात, त्या जागी कृपेची शीतल सावली पसरलेली आहे.
pocketpage.in