Abhang 354
पावलों पावलों । देवा पावलों रे ॥१॥ ॥ ध्रु. ॥ बरवें संचित होतें तैसें जालें रे । आतां काय बोलों रे ॥२॥ सोज्ज्वळ कंटकवाटा भावें करूं गेलों रे । तुका ह्मणे करूनि वेगळा केलों रे ॥३॥
देवा, मी पोहोचलो, मी पोहोचलो! माझे जसे चांगले प्रारब्ध (पूर्वसंचित) होते तसेच घडले, आता याविषयी अजून काय बोलू? काट्याकुट्यांची वाटही मी श्रद्धेने, भावाने पार करत गेलो. तुकाराम म्हणतात, देवाने मला संसारापासून वेगळे करून घेतले.
pocketpage.in