Abhang 360
वैकुंठा जावया तपाचे सायास । करणें जीवा नास न लगे कांहीं ॥१॥ तया पुंडलिकें केला उपकार । फेडावया भार पृथ्वीचा ॥२॥ तुका ह्मणे सोपी केली पायवाट । पंढरी वैकुंठ भूमीवरी ॥३॥
वैकुंठाला जाण्यासाठी कठोर तपश्चर्येचे कष्ट करावे लागतात, जिवाचा नाश करून घ्यावा लागतो, असे मुळीच नाही. पृथ्वीचा भार हलका करण्यासाठी पुंडलिकाने हा मोठा उपकार करून ठेवला. तुकाराम म्हणतात, त्याने सोपी पायवाट करून दिली - पंढरी म्हणजेच या भूमीवरचे वैकुंठ आहे.
pocketpage.in