Abhang 46
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेदभ्रम अमंगळ ॥ १ ॥ ध्रु. ॥ अइका जी तुह्मी भक्त भागवत । कराल तें हित सत्य करा ॥ ध्रु. ॥ कोणा ही जिवाचा न घडो मत्सर । वर्म सर्वेश्वरपूजनाचें ॥ २ ॥ तुका ह्मणे एका देहाचे अवयव । सुख दुःख जीव भोग पावे ॥ ३ ॥
हे सगळं जग विष्णुमय आहे - हाच वैष्णवांचा खरा धर्म आहे; कुणात भेद आहे असं मानणं हा एक अशुभ भ्रम आहे. ऐका हो, तुम्ही भागवत भक्त आहात - जे काही हित कराल ते मनापासून, खरेपणानं करा. कुठल्याही जिवाचा मत्सर करू नका - हेच खरं सर्वेश्वराच्या पूजेचं गुपित आहे. तुकाराम म्हणतात, हे सगळे जीव जणू एकाच देहाचे अवयव आहेत - त्या एका देहालाच सुख-दुःखाचा भोग भोगावा लागतो.
pocketpage.in