Abhang 468
पुरविली आळी । जे जे केली ते ते काळीं ॥१॥ ॥ ध्रु. ॥ माय तरी ऐसी सांगा । कृपाळुवा पांडुरंगा ॥२॥ घेतलें न उतरी उचलोनि कडियेवरी ॥३॥ तुका ह्मणे घांस । मुखीं घाली ब्रह्मरस ॥४॥
जेव्हा जेव्हा मी हट्ट केला, तेव्हा तेव्हा तो पुरवला गेला ॥१॥ धृ.॥ अशी आई असते का हो कुठे, कृपाळू पांडुरंगा? ॥२॥ एकदा कडेवर घेतलं की मग खालीही उतरू देत नाही ॥३॥ तुकाराम म्हणतात, ती मुखात ब्रह्मरसाचाच घास घालते ॥४॥
pocketpage.in