Abhang 469
कथेची सामग्री । देह अवसानावरी ॥१॥ ॥ ध्रु. ॥ नको जाऊं देऊं भंगा । गात्रें माझीं पांडुरंगा ॥२॥ आयुष्य करीं उणें । परी मज आवडो कीर्तन ॥३॥ तुका ह्मणे हाणी । या वेगळी मना नाणीं ॥४॥
कथा-कीर्तनाची ही सगळी सामग्री देहाच्या शेवटच्या घटकेपर्यंत हवी ॥१॥ धृ.॥ पांडुरंगा, माझी ही अवयवं मोडकळीला जाऊ देऊ नकोस ॥२॥ माझं आयुष्य कमी कर हवं तर, पण मला कीर्तनाचीच आवड राहू दे ॥३॥ तुकाराम म्हणतात, हवं तर घाव घाल, पण याखेरीज दुसरं काही मनात आणू नकोस ॥४॥
pocketpage.in