Abhang 472
हिरा शोभला कोंदणीं । जडित माणिकांची खाणी ॥१॥ ॥ ध्रु. ॥ तैसा दिसे नारायण । मुख सुखाचें मंडण ॥२॥ कोटि चंद्रलीळा । पूर्णिमेच्या पूर्णकळा ॥३॥ तुका ह्मणे दृष्टि धाये । परतोनि माघारी न ये ॥४॥
कोंदणात हिरा शोभावा, माणकांची खाणच जडवावी तसा ॥१॥ धृ.॥ तसाच नारायण दिसतोय, त्याचं मुख जणू सुखाचंच अलंकरण आहे ॥२॥ कोट्यवधी चंद्रांची लीला आणि पौर्णिमेची पूर्ण कळा जणू त्यात एकवटलीय ॥३॥ तुकाराम म्हणतात, दृष्टी अशी तृप्त होते की ती परत मागे फिरतच नाही ॥४॥
pocketpage.in