Abhang 475
जीवेंसाटीं यत्नभाव । त्याची नाव बळकट ॥१॥ ॥ ध्रु. ॥ पैल तीरा जातां कांहीं । संदेह नाहीं भवनदी ॥२॥ विश्वासाची धन्य जाती । तेथें वस्ती देवाची ॥३॥ तुका ह्मणे भोळियांचा । देव साचा अंकित ॥४॥
जो जिवाच्या किमतीवर पूर्ण समर्पणाने प्रयत्न करतो, त्याचीच नाव (होडी) बळकट असते ॥१॥ धृ.॥ अशा नावेतून भवनदीच्या पैल तीराला जाताना काहीच शंका उरत नाही ॥२॥ विश्वासाची जात धन्य होय, तिथेच देवाची वस्ती असते ॥३॥ तुकाराम म्हणतात, देव हा खरोखर भोळ्याभाबड्या भक्तांच्या अंकित असतो ॥४॥
pocketpage.in