Abhang 481
आली लळिताची वेळ । असा सावध सकळ ॥१॥ ॥ ध्रु. ॥ लाहो करा वेगीं स्मरा । टाळी वाउनि विश्वंभरा ॥२॥ जालिया अवसान । न संपडती चरण ॥३॥ तुकयाबंधु ह्मणे थोडे । अवधि उरली आहे पुढें ॥४॥
लळिताची वेळ आली आहे, सगळेजण सावध राहा ॥१॥ धृ.॥ लगेच संधी साधा, टाळ्या वाजवून विश्वंभराचं स्मरण करा ॥२॥ शेवटची घटका आली की मग चरण गाठताच येणार नाहीत ॥३॥ तुकयाबंधु म्हणतात, आता पुढे फार थोडा अवधी उरला आहे ॥४॥
pocketpage.in