Abhang 484
करुनि उचित । प्रेम घालीं हृदयांत ॥१॥ ॥ ध्रु. ॥ आलों दान मागायास । थोरी करूनियां आस ॥२॥ चिंतन समयीं । सेवा आपुली च देई ॥३॥ तुकयाबंधु ह्मणे भावा । मज निरवावें देवा ॥४॥
जे उचित असेल ते करून माझ्या हृदयात प्रेम घाल ॥१॥ धृ.॥ मी मोठी आशा बाळगून तुझ्याकडे दान मागायला आलोय ॥२॥ मी चिंतन करत असताना मला तुझी सेवाच लाभू दे ॥३॥ तुकयाबंधु म्हणतात, देवा, मला भावानेच स्वतःकडे सोपवून घे ॥४॥
pocketpage.in