Abhang 487
कृपाळु भक्तांचा । ऐसा पति गोपिकांचा ॥१॥ ॥ ध्रु. ॥ उभा न पाचारितां दारीं । न सांगतां काम करी ॥२॥ भाव देखोनि निर्मळ । रजां वोडवी कपाळ ॥३॥ तुकयाबंधु ह्मणे न भजा । कां रे ऐसा भोळा राजा ॥४॥
भक्तांवर एवढा कृपाळू आहे हा गोपिकांचा पती ॥१॥ धृ.॥ न बोलावताच दारात उभा राहतो, न सांगताच काम करून टाकतो ॥२॥ निर्मळ भाव पाहून तो भक्तांच्या पायीच्या धुळीला आपलं कपाळ टेकवतो ॥३॥ तुकयाबंधु म्हणतात, असा भोळा राजा असूनही तुम्ही त्याला का भजत नाही? ॥४॥
pocketpage.in