Abhang 49
जन विजन जालें आह्मां । विठ्ठलनामा प्रमाणें ॥ १ ॥ ध्रु. ॥ पाहें तिकडे बापमाय । विठ्ठल आहे रखुमाई ॥ ध्रु. ॥ वन पट्टण एकभाव । अवघा ठाव सरता जाला ॥ २ ॥ आठव नाहीं सुखदुःखा । नाचे तुका कौतुकें ॥ ३ ॥
विठ्ठलाच्या नामाच्या प्रभावानं आता गर्दीही आम्हाला एकांतासारखीच वाटते. जिकडे पाहावं तिकडे मला आई-वडीलच दिसतात - तिथे विठ्ठल आहे, तिथे रखुमाई आहे. रान असो वा गाव, माझा भाव मात्र एकच आहे - जागेचा भेदच आता उरलेला नाही. सुख-दुःखाची आठवणही राहिलेली नाही - तुकाराम आनंदानं नाचतो आहे.
pocketpage.in