Abhang 492
करूनी विनवणी पायीं ठेवीं माथा । परिसावी विनवणी माझी पंढरीनाथा ॥१॥ ॥ ध्रु. ॥ अखंडित असावेंसें वाटतें पायीं । साहोनि संकोच ठाव थोडासा देई ॥२॥ असो नसो भाव आलों तुझिया ठाया । पाहें कृपादृष्टी मज पंढरीराया ॥३॥ तुका ह्मणे आह्मी तुझीं वेडीं वांकडीं । नामें भवपाश हातें आपुल्या तोडीं ॥४॥
विनवणी करून पायांवर मस्तक ठेवतो; पंढरीनाथा, माझी ही विनवणी ऐक ॥१॥ धृ.॥ सतत तुझ्या चरणांपाशीच राहावं असं वाटतं; संकोच सोसूनही मला थोडीशी जागा दे ॥२॥ माझ्यात भाव असो वा नसो, मी तुझ्याच ठिकाणी आलोय; पंढरीराया, माझ्याकडे कृपादृष्टीने बघ ॥३॥ तुकाराम म्हणतात, आम्ही तुझी वेडीवाकडी लेकरं आहोत; तूच आपल्या हातांनी नामाच्या साह्याने आमचा भवपाश तोड ॥४॥
pocketpage.in