Abhang 496
बहुडविलें जन मन जालें निश्चळ । चुकवूनी कोल्हाळ आला तुका ॥१॥ ॥ ध्रु. ॥ पर्यंकीं निद्रा करावें शयन । रखुमाई आपण समवेत ॥२॥ घेउनियां आलों हातीं टाळ वीणा । सेवेसि चरणा स्वामीचिया ॥३॥ तुका ह्मणे आतां परिसावीं सादरें । बोबडीं उत्तरें पांडुरंगा ॥४॥
लोकांना निरोप देऊन पाठवलं, मन आता निश्चळ-शांत झालंय; गलका टाळून तुकाराम इथे आलाय ॥१॥ धृ.॥ आता पलंगावर शयन कर, विश्रांती घे; रखुमाईसह झोप ॥२॥ हातात टाळ-वीणा घेऊन मी स्वामींच्या चरणसेवेला आलो आहे ॥३॥ तुकाराम म्हणतात, पांडुरंगा, आता आदरानं माझी ही बोबडी वाणी ऐकून घे ॥४॥
pocketpage.in