Abhang 62
शुद्धबीजा पोटीं । फळें रसाळ गोमटीं ॥१॥ ॥ध्रु.॥ मुखीं अमृताची वाणी । देह वेचावा कारणीं ॥२॥ सर्वांगीं निर्मळ । चित्त जैसें गंगाजळ ॥३॥ तुका ह्मणे जाती । ताप दर्शनें विश्रांती ॥४॥
चांगल्या, शुद्ध बीजापासूनच गोड आणि रसरशीत फळ मिळते. अशा माणसाच्या तोंडात अमृतासारखी गोड वाणी असते, त्याने आपला देह चांगल्या कारणासाठीच खर्ची घातलेला असतो. तो सर्वांगाने निर्मळ असतो, त्याचे मन गंगेच्या पाण्यासारखे पवित्र असते. तुकाराम महाराज म्हणतात, अशा माणसाच्या केवळ दर्शनानेच इतरांचे दुःख-ताप नाहीसे होऊन त्यांना विश्रांती मिळते.
pocketpage.in