Abhang 63
चित्त समाधानें । तरी विष वाटे सोनें ॥१॥ ॥ध्रु.॥ बहु खोटा अतिशय । जाणां भले सांगों काय ॥२॥ मनाच्या तळमळे । चंदनें ही अंग पोळे ॥३॥ तुका ह्मणे दुजा । उपचार पीडा पूजा ॥४॥
मन जर समाधानी-शांत असेल, तर विषसुद्धा सोन्यासारखे गोड वाटते. मनाची अस्वस्थता मात्र फार भयंकर असते, हे शहाण्या माणसांना माहीतच आहे, अजून काय सांगू? मन जर तळमळत, अस्वस्थ असेल, तर थंडगार चंदनही अंगाला चटके देते. तुकाराम महाराज म्हणतात, मनाची शांती नसेल तर इतर कुठलेही उपचार किंवा पूजा-अर्चा म्हणजे केवळ आणखी एक पीडाच ठरते.
pocketpage.in