Abhang 68
पवित्र सोंवळीं । एक तीं च भूमंडळीं ॥१॥ ॥ध्रु.॥ ज्यांचा आवडता देव । अखंडित प्रेमभाव ॥२॥ तीं च भाग्यवंतें । सरतीं पुरतीं धनवित्तें ॥३॥ तुका ह्मणे देवा । त्यांची केल्या पावे सेवा ॥४॥
या पृथ्वीवर खरोखर पवित्र आणि सोवळे तेच लोक आहेत. ज्यांचा जिवलग देवच आहे, ज्यांचे देवावरचे प्रेम कधीही तुटत नाही, तेच खरे भाग्यवान आणि खऱ्या अर्थाने श्रीमंत-संपन्न समजावेत. तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा, अशा लोकांची सेवा केली, की तीच खरी तुझी सेवा घडते.
pocketpage.in